महाराष्ट्रराजकीय

सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान नाही, उपराच होणार पालकमंत्री 

 

सोलापूर : नागपूर येथे आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 39 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने मंत्रिमंडळाची सदस्य संख्या आता 42 झाली आहे. या मंत्रिमंडळात सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणाही आमदाराला मंत्री पदाची संधी मिळालेली नाही. भाजपचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत.

 

सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने आता पालकमंत्री पदाचा भार ही पुन्हा जिल्ह्याबाहेरच्या व्यक्तीकडे जाणार आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नागरिकांतून विशेषतः भाजप समर्थकातून नाराजीचा सूर आहे. सोलापूर मधून माजी मंत्री विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, अन्यथा या देशमुखी वादाला कंटाळून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले अक्कलकोट चे सचिन कल्याणशेट्टी किंवा मंगळवेढ्याचे समाधान आवताडे यांना तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र सर्व चर्चा फोल ठरली. आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी परत चंद्रकांत पाटील किंवा दत्तात्रय भरणे मामा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 39 नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. ‘मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झाले असून मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष संधी देण्याचे ठरले आहे. त्यामुळे आज शपथ घेणारे मंत्री अडीच वर्षांसाठी असतील’, असे अजित पवार म्हणाले आहेत.

 

महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर 6 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 9, शिंदे गटाच्या 6 आणि अजित पवार गटाच्या 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपचे एकूण 19, शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता लवकरच खातेवाटप देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मी माझ्या कर्मभूमी आणि पुण्यभूमीत येत आहे. याचा मला खुप आनंद आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नागपूरमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर माझा परिवार आहे आणि त्यांनी माझे स्वागत केले. नागपुरात दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा नागपुरात आल्याने त्यांचे स्वागत रॅली काढण्यात आली आहे. या स्वागत रॅलीत देवेंद्र फडणवीसांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला.

आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता तर शेतकऱ्यांसाठी होता. ज्या प्रश्नांसाठी लढलो, रक्त सांडले, तुरूंगवास भोगला ते कृषी खाते मिळाले असते तर आवडले असते, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी कृषीमंत्री पद न मिळाल्याची नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. या अधिवेशनात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी सरकारकडे केली आहे.

 

राज्यातील दणदणीत विजयानंतर आज नागपूरच्या राजभवनात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. तब्बल 33 वर्षानंतर पहिल्यादांच नागपूरमध्ये शपथविधी सोहळा झाला. यावेळी तिन्ही पक्षाचे मिळून 38 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार नागपूरमध्ये दाखल झाले होते.

शपथविधीपूर्वी शिंदे गटाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत संवाद साधला. तसेच यावेळी खातेवाटपावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला कोणकोणते मंत्रिपदे मिळाली आहेत. तसेच कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळणार याची आतुरता लागून राहिली होती. दरम्यान, मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने शिंदे गटाच्या नरेंद्र भोंडेकरांनी राजीनामा दिला आहे.

शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपद आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला. मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने भोंडेकरांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. भोंडेकर मंत्रिपदी वर्णी न लागल्याने नाराज आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा तोडगा काढणार आणि कशाप्रकारे भोंडेकरांचे समाधान करणार? पहावे लागेल.

 

अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना नेमके कोणते मंत्रिपद मिळणार पहावे लागणार आहे. विधानपरिषदेत असताना धनंजय मुंडेंनी विधानसभेची निवडणूक लढवत भगिनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले, त्यानंतर शिंदे सरकारमध्ये देखील ते मंत्री होते.

 

 

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी देखील पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना आता कोणते मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

 

सगळ्यांनी मला सरप्राईज दिलं, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी शपथविधीनंतर बोलताना दिली. खात्याबाबत माझी कोणतीही अपेक्षा नाही, पक्षाने कोणतेही खाते दिले तरी मी त्याचे काम करेन, धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून कॅबिनेटमध्ये आहेत, तर मी भाजपकडून मंत्रिमंडळात आहे, बीडचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी देखील अपेक्षा नाही, गोपीनाथ मुंडेंचे नाव कार्यकर्त्यांच्या छातीवर कोरले आहे, असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

मंत्रीपदाची शपथ घेतलेले मंत्री 

1.चंद्रशेखर बावनकुळे

2. राधाकृष्ण विखेपाटील (8वेळ आमदार

3. ⁠हसन मुश्रीफ (6वेळा आमदार )

4. ⁠चंद्रकांत पाटील (2 वेळा आमदार )

5. ⁠गिरीश महाजन (7वेळा आमदार )

6. ⁠गुलाबराव पाटील

7. ⁠गणेश नाईक

8. ⁠दादा भुसे

9. ⁠संजय राठोड

10. ⁠धनंजय मुंडे

11. ⁠मंगलप्रभात लोढा

12. ⁠उदय सामंत

13. ⁠जयकुमार रावळ

14. ⁠पंकजा मुंडे

15. ⁠अतुल सावे

16. ⁠अशोक उईके

17. ⁠शंभूराज देसाई

18. ⁠आशिष शेलार

19. ⁠दत्ता भरणे

20. ⁠आदिती तटकरे

21. ⁠शिवेंद्रसिंह भोसले

22. ⁠माणिकराव कोकाटे

23. ⁠जयकुमार गोरे

24. ⁠नरहरी झिरवळ

25. ⁠संजय सावकारे

26. ⁠संजय शिरसाठ

27. ⁠प्रताप सरनाईक

28. ⁠भरत गोगावले

29. ⁠मकरंद पाटील

30. ⁠नितेश राणे

31. ⁠आकाश फुंडकर

32. ⁠बाबासाहेब पाटील

33. ⁠प्रकाश आबिटकर

 

राज्यमंत्री

 

1. माधुरी मिसाळ

2. ⁠आशिष जयस्वाल

3. ⁠पंकज भोयर

4. ⁠मेघना बोर्डीकर साकोरे

5. ⁠इंद्रनील नाईक

6. ⁠योगेश कदम

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button