महाराष्ट्रराजकीय

नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी; एनडीएला ऐतिहासिक जनादेश

लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली

मुंबई : राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यानंतर आता राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सोहळा पार पडणार आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष असेल.

 

विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून या निकालात महायुतीने महाविकास आघाडीचे सुपडासाफ केला आहे. २५ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्चित नसलं तरी २६ नोव्हेंबरला विधानसभा बर्खास्त होणार आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला मतदान केले आहे, असे अजित पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट केले आहे. राज्य कंगाल केले, अशी आमच्यावर टीका झाली, पण लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, यामुळे आम्हाला एवढे मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच एवढे मोठे यश मिळताना मी पाहिले, पण आम्ही जमिनीवर पाय ठेवून काम करु, असे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड मोठ्या मताधिक्याच्या स्वरूपात 5 वर्षांसाठी आमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची आणि सर्व समाजघटकाच्या हिताची, असे अजित पवारांनी ट्विट करत म्हटले. तसेच कोणाच्या विरोधात टीकाटिप्पणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही प्राधान्यानं महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी बोलू आणि जे बोलू तेच करू, असेही म्हटले.

महायुतीकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने शपथविधीसाठी 25 नोव्हेंबरचा विचार सुरू केला आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने त्याआधीच सत्तास्थापन करण्याचा महायुतीचा मानस असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीने बंद पाडलेली कामे आम्ही पुन्हा सुरु केली, अनेक विकासकामे आम्ही केली, राज्याचा सर्वांगीण विकास करताना आम्ही सर्व घटकांना समोर ठेवले, मोदीजी आमच्या पाठीशी आहेत, विरोधक आमच्यावर बेछूट आरोप करत होते, आम्ही कामातून या आरोपांना उत्तर दिले, आमची नियत साफ आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राने, विकासाबरोबरच संस्कृती आणि राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या महायुतीला प्रचंड बहुमत देऊन, संभ्रम आणि खोटेपणाच्या आधारे संविधानाचे नकली हितचिंतक बनणाऱ्यांच्या दुकानाला टाळे ठोकण्याचे काम केले. हा प्रत्येक महाराष्ट्रवासियाचा विजय आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. मोदींनी एकनाथ शिंदेंशी संवाद साधून राज्यातील महायुतीच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने शानदार विजय मिळवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत विकासाचा विजय ! सुशासनाचा विजय ! एकजूट होऊन उंच झेप घेऊ, असे म्हटले. एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील भगिनी आणि बांधवांचे मनःपूर्वक आभार. ही आपुलकी आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी कार्यरत राहील, याची मी जनतेला ग्वाही देतो, असेही म्हटले.

 

सोलापूर जिल्ह्यातील 9 जागांचे निकाल जाहीर

 

* माढा-शरद पवार गटाचे अभिजीत पाटील विजयी

 

* बार्शी-ठाकरे गटाच्या दिलीप सोपल यांचा विजय

 

* पंढरपूर-भाजपच्या समाधान आवताडेंचा विजय

 

* मोहोळ-शरद पवार गटाचे राजू खरे विजयी

 

* सोलापूर उत्तर-भाजपच्या विजयकुमार देशमुखांचा विजय

 

* सोलापूर दक्षिण-भाजपच्या सुभाष देशमुखांचा विजय

 

* अक्कलकोट-भाजपच्या सचिन कल्याणशेट्टींचा विजय

 

* माळशिरस-शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांचा विजय

 

* सांगोला-शेकापच्या बाबासाहेब देशमुखांचा विजय

 

पुण्यातील 8 विधानसभेचे अंतिम निकाल जाहीर

* शिरुरमध्ये महायुतीचे ज्ञानेश्वर कटके विजयी

 

* पुरंदरमध्ये महायुतीचे विजय शिवतारे विजयी

 

* खडकवासल्यात महायुतीचे भीमराव तापकीर विजयी

 

* वडगावशेरी शरद पवार गटाच्या बापू पठारेंचा विजय

 

* हडपसरमध्ये महायुतीचे चेतन तुपे विजयी

 

* पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये महायुतीचे सुनील कांबळे विजयी

 

* शिवाजीनगरमध्ये महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे विजयी

 

* पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा विजय

 

 

मुंबईतील कोणत्या जागांवर कोण जिंकले ?

 

* विक्रोळी विधानसभा मतदारसंघ सुनील राऊत (ठाकरे गट)

 

* कुर्ला विधानसभा मतदारसंघ – मंगेश कुडाळकर (शिंदे गट)

 

* मुलुंड विधानसभा मतदारसंघ – मिहीर कोटेचा (भाजप)

 

* भायखळा विधानसभा मतदारसंघ – मनोज जामसूतकर (ठाकरे गट)

 

* चेंबूर विधानसभा मतदारसंघ तुकाराम काते (शिंदे गट)

 

* कलिना विधानसभा मतदारसंघ संजय पोतनीस (ठाकरे गट)

 

 

* कांदिवली विधानसभा मतदारसंघ अतुल भातखळकर (भाजप)

 

* अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ — सना मलिक (अजित पवार गट)

 

* माहीम विधानसभा मतदारसंघ महेश सावंत (ठाकरे गट)

 

* दहिसर विधानसभा मतदारसंघ मनीषा चौधरी (भाजप)

 

* वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

 

* शिवडी विधानसभा मतदारसंघ अजय चौधरी (ठाकरे गट)

 

 

* मलबार हिल विधानसभा मतदारसंघ मंगलप्रभात लोढा (भाजप)

 

* बोरिवली विधानसभा मतदारसंघ संजय उपाध्याय (भाजप)

 

* वडाळा विधानसभा मतदारसंघ कालिदास कोळंबकर (भाजप)

 

* कुलाबा विधानसभा मतदारसंघ – राहुल नार्वेकर (भाजप)

 

* वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ आशिष शेलार (भाजप)

 

* अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ — मुरजी पटेल (भाजप)

 

परभणी-धाराशिवमध्ये भाजप विजयी

 

• परभणीतील जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी.

 

● धाराशिवमधील तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजितसिंह विजयी.

 

• परतूर मतदारसंघातून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी.

 

कोल्हापूर जिल्ह्यात कुठं कोण जिंकलं?

 

* कोल्हापूर दक्षिण- भाजपचे अमल महाडिक

 

* कोल्हापूर उत्तर-शिवसेनेचे राजेश क्षीरसागर

 

* करवीर-शिवसेनेचे चंद्रदीप नरके

 

* हातकणंगले-शिवसेनेचे अशोकराव माने

 

* इचलकरंजी-भाजपचे राहुल आवाडे

 

* शिरोळ-शिवसेनेचे राजेंद्र पाटील-यड्रावकर

 

* शाहुवाडी-जनसुराज्यचे विनय कोरे

 

* राधानगरी-शिवसेनेचे प्रकाश आबिटकर

 

* चंदगड- राजेश पाटील * कागल- हसन मुश्रीफ NCP

 

सांगली जिल्ह्यात कुठं कोण जिंकलं?

 

* सांगली – भाजपच्या सुधीर गाडगीळांचा विजय

 

* मिरज – भाजपच्या सुरेश खाडेंचा विजय

 

* तासगाव- शरद पवार गटाच्या रोहित पाटलांचा विजय

 

* खानापूर – शिवसेनेचे सुहास बाबर यांचा विजय

 

* पलूस-कडेगाव – काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत कदमांचा विजय

 

* शिराळा – भाजपच्या सत्यजित देशमुखांचा विजय

 

* इस्लामपूर – शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचा विजय

 

* जत- भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा विजय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button