क्राईमसोलापूर

सोलापुरात 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त, दोन जणांना अटक

 

सोलापूर : सोलापुरातील पंढरपूरमध्ये 10 लाख 14 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. राजू चोरमले, अतुल तावरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी तक्रारदार मधुकर माने यांना गाई गोठ्याचे अनुदान आल्याचे सांगून पैसे दिले. 500 रुपयांच्या नोटा घेऊन मधुकर माने बँकेत गेले. यावेळी नोटा बनावट असल्याने समजले. यानंतर माने यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

 

 

दहा लाख चौदा हजाराच्या पाचशे रुपयांच्या २०२९ बनावट नोटा चलनात आणण्यात प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार पंढरपूरातील इसबावी येथे घडला असून पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी अतुल भारत तावरे (रा. करकंब) व राजू विश्वनाथ चोरमले (रा.बार्डी, ता. पंढरपूर) या दोघां विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हि घटना काल ६ डिसेंबर रोजी घडली आहे.

 

यातील दोघा आरोपींनी साक्षीदार मधुकर दिगंबर माने (वय. ५५, रा. निमगांव टे., ता. माढा) यांना तुम्हाला गाय-गोठ्यसाठी बारा लाख रुपयाच अनुदान मिळवून देतो अस म्हणून त्यांच्याकडून काम मंजूरीसाठी वेळोवेळी तीन लाख रुपये घेवून काल त्यांना ते पाचशे रुपयाच्या २०२९ बनावट नोटा स्वतःजवळ बाळगून त्या चलनात आणण्याच्या हेतूने साक्षीदारांने देताना मिळून आले असं फिर्यादीत म्हंटलय.

 

 

पाचशे रूपयांच्या नोटा घेऊन माने बँकेत गेले. त्यावेळी त्या बनावट असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी त्याबाबत पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना अटक केली. पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत आहे. यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? हे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल, पण इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा मिळाल्यामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

प्रकरणाबाबात तक्रारदार मधुकर माने म्हणतात, ‘आरोपींनी गाई गोठ्याचे अनुदान मंजूर झाले म्हणून दहा लाख १४ हजार ५०० रूपये दिले होते. यामध्ये ५०० रूपयांच्या २०२९ नोटांचा समावेश होता.’ ही रक्कम घेऊन तक्रारदार बँकेत पोहचला, त्यावेळी सर्व नोटा बनावट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेय. या नोटा बनावट असल्याचे समजताच माने यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button