
सोलापूर : येथील एन.बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्प्युनिकेशन, आणि कॉम्प्युटर सायन्स विभागातील पाच विद्यार्थी पुढील मास्टर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मास्टर ऑफ सायन्स सायबर सिक्युरिटीज प्रोग्राम, काॅम्प्युटर सायन्स आदी शिक्षणासाठी परदेशी रवाना झाले आहेत.
स्वप्नील शरद मेरगू, श्रृतिका विशाल महिंद्रकर, अराफत मोहम्मद नदाफ, सानिया हकीम, आरती संतोषकुमार ओमणे अशी पाच विद्यार्थींची नावे आहेत. या विद्यार्थ्यांना पालकांसह संस्था सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांनी या उच्च पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड होण्यासाठीचे श्रेय एनबीएन सिंहगड इन्स्टिट्यूटला दिले आहे.
स्वप्निल मेरगू हा काॅम्प्युटर सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल मिसूरी येथे गेला आहे. शृतिका विशाल महिंद्रकर ही विद्यार्थिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन येथे रवाना झाली आहे. अराफत नदाफ हा मास्टर ऑफ सायन्स सायबर सिक्युरिटीज प्रोग्रामच्या शिक्षणासाठी बोस्टन कॅम्पस, खौरी काॅलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. सानिया हकीम ही मास्टर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन बिझनेस कोर्ससाठी दुबई स्थित एसपीजी ग्लोबल काॅलेजमध्ये दाखल झाली आहे. आरती संतोषकुमार ओमणे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेस्ट लंडन स्थित युनिव्हर्सिटी ऑफ ग्रीनवीच येथे प्रवेश घेतला आहे.
परदेशी शिक्षणासाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रा. डाॅ. शेखर जगदे, डाॅ. आर. टी. व्यवहारे, प्रा. एच.टी. गुरमे, प्रा. एस.एस. शिरगण यांचे मार्गदर्शन लाभले.