राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी एकनाथ घाडगे यांची निवड

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर शहर उपाध्यक्षपदी निराळे वस्ती भागातील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ असल्याने त्यांची शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी या पदावर निवड केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने व पक्षाचे प्रभारी निरीक्षक शेखर माने यांच्या सल्ल्यानुसार ही निवड झाली असून माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते घाडगे यांना याबाबतच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
या पदाचा आपण सर्व सहकाऱ्याना बरोबर घेऊन पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी उपयोग करावा, असे या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.या निवडीमुळे घाडगे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.