महाराष्ट्र

Boat accident मुंबईत बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू ;101 जणांना वाचवण्यात यश

 

मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यात 10 नागरिक आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांच समावेश आहे. 101 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे. अजूनही काही प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती आहे. नीलकमल नावाच्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने आज ही दुर्घटना घडली आहे.

 

 

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळच्या बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, अजूनही शोधकार्य सुरु आहे, उद्यापर्यंत अंतिम माहिती मिळेल, काहीजण बेपत्ता आहेत, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान आज नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली. या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीने धडक दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

 

 

दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याची घटना घडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देताना म्हटले, ‘मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्या बोटीवर सुमारे 30 ते 35 जण होते. त्यापैकी 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अद्याप 5 ते 7 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर माहिती मिळताच मी सभागृहात निवेदन देईन’.

 

 

मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोराची धडक दिली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नौदलाची बोट वेगाने येताना आणि प्रवाशांच्या बोटीला धडकताना दिसत आहे. नीलकमल बोट एलिफंटाकडे जात होती. या धडकेनंतर बोट उलटली. यात तिघांचा मृत्यू झाला.

 

मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये आमच्या बोटीची काही चूक नव्हती, तर या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली, ते या अपघातासाठी जबाबदार आहेत, अशी माहिती अपघातग्रस्त बोटीशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही बोट चार वाजता एलिफंटाकडे जात होती. त्यावेळी उरण कारंजा या ठिकाणी एका स्पीड बोटीने या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिली.

 

बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या एका प्रवाशाने त्याच्यासमोर काही प्रवासी बुडाल्याचा दावा केला आहे. अशोक असे या प्रवाशाचे नाव आहे. मी लाइफ जॅकेट घालेपर्यंत एका बोटीने आमच्या बोटीला धडक दिली, मला स्विमींग येत असल्याने मी कसाबसा बाहेर पडलो, असे अशोकने सांगितले आहे.

 

समुद्रात आज नीलकमल नावाच्या बोटीला भयंकर अपघात झाला आहे. उरण कारंजा या ठिकाणी या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली असून यामध्ये नीलकमल नावाची बोट समुद्रात बुडाली आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. या बोटीत 84 प्रवासी होते. यातील 7 प्रवासी बेपत्ता आहेत, असे सांगितले जात आहे.

 

 

बोट उलटल्याने सुरु झालेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवण्यात आले आहे. मदतकार्यासाठी गेलेल्या सर्व बोटी बाहेर आल्या आहेत. या बोटीत 84 प्रवासी होते. यातील बहुतेक प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातील 66 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही प्रवासी अजूनही बेपत्ता आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने बचाव कार्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसेच जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदत पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले असून, नौदल, कोस्ट गार्ड, पोर्ट अथॉरिटी आणि पोलिस पथकांच्या बोटी मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, असे सांगितले.

 

 

समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडाल्याचे वृत्त धक्कादायक आहे. ह्या दुर्घटनेत 30 ते 35 प्रवासी बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. बचाव कार्य सुरू आहे. ह्या बचाव कार्याला त्वरित यश मिळावं व सर्व प्रवासी सुखरूप असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले.

 

एलिफंटाकडे जाणारी बोट उलटून काही प्रवाशांचा मृत्यू तर काही बेपत्ता असल्याचं वृत्त धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि बेपत्ता असलेले प्रवाशी सुखरूप परतावेत, ही प्रार्थना, असे रोहित पवार म्हणाले. तसेच पण ही दुर्घटना का घडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button