
सोलापूर : सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. शंकर नवले आणि कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन , सोलापूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि रिसर्च स्टुडंट अमित अर्जुन देशमुख यांना अल्ट्राव्हाइड बँड अँटेना या विषयावर भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आले.
एनबीएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. शंकर नवले पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित अर्जुन देशमुख (रिसर्च स्टुडन्ट) यांनी सदर अँटिना डिझाईनची निर्मिती केली आहे. यामध्ये या पेटंट चा उपयोग उच्च डेटा दरांसह शॉट-रेंज वायरलेस कम्युनिकेशनचे समर्थन करतात.
लॉट आणि ग्राहक उपकरणांसाठी तसेच यु डब्ल्यू अँटेना रडार सिस्टीममध्ये थ्रू-वॉल इमेजिंग आणि कीलेस एंट्री सारख्या ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशन्ससाठी देखील वापरले जातात. या व्यतिरिक्त, ते लष्करी आणि सुरक्षित संप्रेषण प्रणालींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामुळे हे पेटंट उपयुक्त ठरणार आहे. या पेटंट बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम एन नवले यांच्या सह संस्थेतील सर्व संचालक आणि सोलापूर, पंढरपूर सिंहगड कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.