
सोलापूर : एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षातील विक्रम, धवण, रमण, कलाम, कल्पना, रामानुजन या सहा डिव्हिजन विद्यार्थी, पालक, शिक्षक मेळावा पार पडला. पालकसभेचा वाढता प्रतिसाद आणि संख्या खूप असल्याने सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात पालक मेळावा पार पडला.
दोन्ही सत्रातील मेळाव्यास जास्तीत जास्त उपस्थिती लावून पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यातून पालकांची आपल्या पाल्यांविषयी असलेली जबाबदारीची जाणीव दिसून आली. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू एस. एच पवार यांची उपस्थिती होती. संस्था सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले,उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, जीएसईचे विभाग प्रमुख किरण पाटील यांची मंचावर उपस्थिती होती. पालक प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थिती दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक प्रा. सुवर्णा क्षीरसागर यांनी केले.
जीएसईचे विभाग प्रमुख प्रा. किरण पाटील यांनी पालकांना प्रभावीपणे मार्गदर्शन केले. आपला पाल्य प्रथम वर्षात शिकत आहे, नुकताच पहिल्या युनिट टेस्ट चा रिझल्ट लागला असून या परीक्षेत आपल्या पाल्याने केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच दुसऱ्या युनिट टेस्ट व विद्यापीठाच्या प्रथम सेमिस्टर च्या परीक्षेची तयारी यासंदर्भात चर्चा होणे गरजेचे आहे त्यासोबतच पाल्य व त्याची एकंदर प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या टाईम मॅनेजमेंट आणि महाविद्यालयातील हजेरीवर लक्ष देण्यावर चर्चा झाली.
महाविद्यालयात दिवसाची हजेरी न घेता प्रत्येक लेक्चरला हजेरी घेतली जाते. पाल्य कोणत्या लेक्चर गैरहजर हे त्या त्या विभागातील विभागप्रमुखास लगेच समजते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हजेरीवर सूक्ष्मपणे काम केले जात आहे. त्यासाठी 2015 पासून ‘टिचर्स गार्डीयन’ ची अंमलबजावणी केली जात आहे. याचा प्रभावीपणे वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत घट झाली आहे. प्रत्येक 20-25 विद्यार्थ्यांवर एका गार्डीयन टिचर्सची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे प्रत्येक पाल्यांचा, पालकांचा मोबाइल नंबर आहे. पाल्य गैरहजर राहिल्यास लगेच एसएमएस द्वारे कळवले जाते. एकदा विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश केल्यास त्यास गेटपासशिवाय बाहेर सोडले जात नाही. गेटपासवर शिक्षक, एचओडी, प्राचार्याची सही असल्याशिवाय सोडले जात नसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. गार्डीयन टीचर प्रत्येक बुधवारी विद्यार्थ्यांचे प्रश्न टीजी मिटिंग मध्ये मांडतात. त्यावर सकारात्मक चर्चा करून विभाग प्रमुखांच्या स्तरावर सोडवली जातात. राहिलेले प्रश्नावर प्राचार्यस्तरावर सोडवले जातात.
कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ.ए.ए. कांबळे यांनी काम पाहिले. शिस्तपालन विषयावर डाॅ. व्ही.व्ही. खरात, डॉ. आय. एम. चंद्रकी यांनी मार्गदर्शन केले. अल्पोपाहाराने पालक मेळाव्याची सांगता झाली. दोन्ही सत्रातील सूत्रसंचालन विद्यार्थी मनस्वी पुजारी, साकेत कांबळे, आरती गायकवाड यांनी केले.
○ दहा वर्षापासून एकच प्राचार्य
संस्था सचिव संजय नवले यांनी दहा वर्षापासून एकच प्राचार्य असल्याने महाविद्यालयाची प्रगती झाली असल्याचे सांगितले. सर्वोत्कृष्ट प्राचार्य, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट संस्था असे पुरस्कार मिळाले आहेत. सिंहगडचे दहा महाविद्यालय आहेत. मात्र सर्वाधिक शंभर टक्के ॲडमिशन, चांगल्या गुणवत्तेबाबत सोलापूरचे महाविद्यालय सरस असल्याचे सांगितले. यावेळेस युवा महोत्सवासह सेमिस्टरवाईज चांगले गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार केला. प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी 2010 साली सिंहगड इन्स्टिट्यूटची सुरुवात झाल्याचे सांगितले. 2014 साली पहिली बॅच बाहेर पडली. सोलापुरात पहिली आयटी कंपनी आणणारा सिंहगडचा विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे प्राचार्य नवले यांनी सांगितले.
● आयुष्य जगायला शिकवणारी संस्था
तृतीय वर्षातील निवडक विद्यार्थ्यांने सिंहगडविषयी मनोगत व्यक्त केले. गौरी शिंदे, निखिल घोडके यांनी सिंहगडमधून शिक्षण तर मिळालेच पण क्वालिटीचे शिक्षण मिळाले. सुप्त कलागुणांना शोधून त्यास आकार देण्यासाठी प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे टाकल्याचे म्हटले. कॅपस डायरेक्टर संजय नवले प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्याचे सांगताना युवा महोत्सवातील एक उदाहरण निखिल घोडके यांनी सांगितले. महाविद्यालय मिळालेले पुरस्कार आणि येथील नैसर्गिक वातावरण पाहून कॅप्टन महेश क्षीरसागर या पालकाने पुणे सोडून सिंहगड सोलापूरला प्राधान्य दिल्याचे सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.