सोलापूर

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रमात मिळाले ‘गुंतवणुकी’चे धडे

म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये बॅंकिंगपेक्षा जादा परतावा

सोलापूर : येथील केंगाव सिंहगड अभियांत्रिकी (nbnscoe) महाविद्यालयात अध्यापन व अशैक्षणिक प्राध्यापकांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्राध्यापक राजशेखर येळीकर यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते श्री. येळीकर यांचा सन्मान केला. कार्यक्रम समन्वयक म्हणून डाॅ. शेखर जगदे यांनी काम पाहिले. यावेळेस मंचावर डाॅ. आर. टी. व्यवहारे यांची उपस्थिती होती. 

 

या कार्यक्रमात म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटवर माहिती देण्यात आली. हा व्यवहार करण्यासाठी डी मॅट खात्याची आवश्यकता असते. डीमॅट खात्यासह इतर ब्रोकरेज चार्जसह व्यवहारानंतर मेलवर येणा-या काॅन्ट्रक्ट नोटपर्यत माहिती दिली. महागाईचा दर वर्षाला सहा टक्क्यांनी वाढत असताना परंपरागत बॅंकिंग, एफडी अशा गुंतवणुकीत गुंतवणुक करण्यापेक्षा माहिती घ्या आणि एसआयपी करण्याचा सल्ला दिला. सर्व माहिती घेऊन म्युच्युअल फंड , चांगल्या कंपनी स्टाॅकमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला.

 

विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळीन गुंतवणुकीत लक्ष घाला. अल्पावधीत डबल पैसे करणा-या इंट्राडे, फ्युचर ऑप्शनकडे वळून आर्थिक नुकसान करुन घेऊ नका, असा मौलिक सल्ला दिला. यावेळेस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.

 

 

म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. त्याकरिता आधारकार्ड , पॅनकार्ड आवश्यक आहे. या दोन्ही कागदपत्रांसह व्हिडिओ केवायसी झाली की डी मॅट खाते ओपन होते. यात व्यवहार, गुंतवणुक करताना लाॅगटर्मचा विचार करावा, शार्टटर्ममध्ये यात अधिक माहिती असणे आवश्यक आहे. पण जास्तीचा परतावा हा लाॅगटर्म मध्येच जादा मिळतो. कोणी सांगतो म्हणून, कोणाच्या सांगण्यावरून कोणताही म्युच्युअल फंड, कंपनीचा शेअर घेऊ नका. स्वत अभ्यास करुन, त्याचा फंडामेंटल अभ्यास करूनच गुंतवणुक करा. भारतीय शेअर मार्केटमध्ये सहा हजाराहून अधिक कंपन्या आहेत.

 

श्री. येळीकर यांनी म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतील परतावा समजावून सांगण्यासाठी विविध कंपन्यांची उदाहरण माहिती दिली. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड जुगार नसून गुंतवणुकीसाठी मोठा फ्लॅटफार्म आहे. यात फसवणूक होत नाही. यावर सेबीचे मोठे नियंत्रण आहे. पूर्वी मॅन्यूअल व्यवहार असल्याने ब्रोकरला अफरातफर करता येत होती. पण आता सर्व ऑनलाईन, डिजिटिलायझेशन झाल्याने अफरातफरीचा धोकाच नसल्याचे ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button