महाराष्ट्रसोलापूर

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे नवे पालकमंत्री

अजित पवार बीड, पुण्याचे पालकमंत्री

 

सोलापूर : सोलापुरात भाजपचे पाच आमदार असूनही, सोलापूरला मंत्रीपदापासून वंचित ठेवले. यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरवरील नाराजी उघड झाली होती. त्यानुसार सोलापूरला उपरा पालकमंत्री मिळणार हे पक्के झाले होते . त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूरचे नवे पालकमंत्री झाले आहेत. 

 

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे. यातून धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. वाल्मिक कराड प्रकरण अंगलट येणार आहे.

राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्या उशिराने झाला. त्यानंतर पालकमंत्री कोण होणार, यासाठीही उशीर झाला. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो, असे धनंजय मुंडेंनी ट्विट करत सांगितले. मला पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल आभारी आहे, असेही ते म्हणाले.

 

जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असल्याने हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच विकासकामे बुलेट ट्रेनच्या स्पीडने मार्गी लागतील; असा विश्वास असल्याचे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

 

शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. येत्या 23 तारखेला मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 25 जानेवारीला मी आणि बच्चू कडू जंतर-मंतरवर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर पोटनिवडणूक जाहीर केली नाही आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

 

पालकमंत्र्यांची यादी जाहीर

 

कोल्हापूर- प्रकाश आबिटकर

 

बुलढाणा- मकरंद जाधव

 

भंडारा- संजय सावकारे

 

सोलापूर- जयकुमार गोरे

 

नंदुरबार – माणिकराव कोकाटे

 

लातूर- शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

चंद्रपूर- अशोक उईके

 

धुळे- जयकुमार रावल

 

– पंकजा मुंडे- जालना

 

अजित पवार- बीड आणि पुणे

 

संजय सिरसाट – छत्रपती संभाजीनगर

 

आदिती तटकरे- रायगड

 

– गिरीश महाजन- नाशिक

 

– नितेश राणे – सिंधुदुर्ग

 

– देवेंद्र फडणवीस- गडचिरोली

 

– एकनाथ शिंदे- ठाणे

 

नरहरी झिरवाळ – हिंगोली

 

प्रताप सरनाईक- धाराशिव

 

उदय सामंत- रत्नागिरी

 

शंभुराज देसाई- सातारा

 

अतुल सावे – नांदेड

 

बाबासाहेब पाटील- गोंदिया

 

मुंबई शहर- एकनाथ शिंदे

 

हसन मुश्रीफ – वाशिम

 

चंद्रशेखर बावनकुळे- अमरावती आणि नागपूर

 

आकाश फुंडकर- अकोला

 

गणेश नाईक- पालघर

 

संजय राठोड- यवतमाळ

 

आशिष शेलार – मुंबई उपनगर

 

बाबासाहेब पाटील- गोंदिया

 

चंद्रकांत पाटील- सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button