सिंहगड पब्लिक स्कूल स्नेहसंमेलनात शहिद पत्नीच्या हस्ते सात हजाराचे बक्षीस

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिंहगड पब्लिक स्कूल संस्थेच्या केगाव येथील प्रांगणात स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात झाले. मराठी, हिंदी गीतांवर विद्यार्थ्यांने समूह नृत्य सादर केले. रंगमंचावरील ऐतिहासिक प्रसंग तर रोमांचकारी ठरले. शेवटचा शिवराज्याभिषेक सोहळ्याने सर्वांना खिळवून ठेवले.
शिवकालीन प्रसंग, नेपथ्य आणि संवाद यांचा सुंदर मिलाफ घडला होता. एलकेजी, युकेजीसह दहावीपर्यंत इयत्तेतील एकूण 443 चिमुकल्यांसह विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात सहभाग नोंदविला. एसटीईएसच्या एज्युकेशन डायरेक्टर डाॅ. आशा बोकील, फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. यावेळेस कमलापूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य चैताली मराठे, सोलापूर सिंहगड पब्लिक स्कूलचे प्राचार्य निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस. एच पवार, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डाॅ. रवींद्र व्यवहारे यांची उपस्थिती होती.
मंगळागौर, गुढी पाडवा, रक्षाबंधन, गणपती उत्सव, गोंधळीगीत, दिवाळी या सण उत्सवासह जिंगलबेल, एबीसीडी, देशभक्ती, कोळीगीत, पंजाबी गीत सादर केली. यात विद्यार्थ्यांनी आपली उत्तम नृत्य कला सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. स्नेहसंमेलनास हजारोच्या संख्येनी पालकांची उपस्थिती होती. पाल्यांची कला आपल्या मोबाईल कॅम-यात टिपण्यासाठी पालकांची चढाओढ चालली होती.
● शहिद पत्नीच्या हस्ते सात हजाराचे बक्षीस
बालचमूंनी देशभक्ती गीत सादर केले. हे गीत आवडल्याने उपस्थित पालकांमधील शहीद पत्नी कांता भोसले यांनी या गाण्यास सात हजार रुपये बक्षीस दिले. त्यांच्यासोबत शहीद वीराचा मुलगा दीपक भोसले यांचीही उपस्थित होती. याच सादर केलेले गीतास बार्शीत पार पडलेल्या इंटरस्कूल डान्स फेस्टिव्हल स्पर्धेत 40 हजारांचे बक्षीस मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता.