
सोलापूर : केगाव येथील एन.बी.एन . सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपली ट्रेनिंग ॲड प्लेसमेंटची अखंड परंपरा अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष चालू असतानाच ट्रेनिंग व प्लेसमेंटमधून 184 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.
वर्षभरात अंतिम वर्ष पदवी विद्यार्थ्यांसाठी सतत विविध कंपन्यांचे कॅम्पस ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते. यामध्ये यूएमसी कंपनी, क्वालिटी किऑस्को , पायसिस्ट , कॅपजेमिनी, आयओटेक सोल्युशनस , काॅग्निझंट, आयवा प्रायव्हेट लिमिटेड अशा विविध कंपनीत चांगल्या सॅलरी पॅकेजवर प्लेसमेंटची संधी मिळाली आहे. या निवडी बुद्धिमत्ता चाचणी आणि गट चर्चेद्वारे नंतर अंतिम मुलाखत अशी निवड होत असते.
तसेच क्युसपायडरस कंपनीत, किरण अकॅडमी , आयफोरसी, सिम्बायोसिस कन्सल्टन्सी या ठिकाणी विद्यार्थ्यांची ट्रेनिंग करता निवड झाली आहे. ट्रेनिंग व्यवस्थित पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढे प्लेसमेंटची संधी मिळणार आहे. सरत्या शेवटी या डिसेंबर महिन्यात सोलापूरच्या एलएचपी मोटार्स कंपनीचा प्लेसमेंट ॲड ट्रेनिंग कॅम्पस ड्रायव्हचे आयोजन केले होते. त्यांचा निकाल येण्यास आणखी अवधी आहे. पुढील वर्षी जानेवारी 2025 मध्ये सुद्धा अशा प्रकारे नामांकित कंपन्यांचे प्लेसमेंट अॅड ट्रेनिंग चे कॅम्पस ड्रायव्हचे आयोजन केले जाणार असल्याचे ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट अधिकारी प्रा. विकास मराठे यांनी सांगितले.
2023 – 24 या मागील शैक्षणिक वर्षांत अंतिम वर्ष पदवी मध्ये शिकत असलेल्या 122 विद्यार्थ्यांची याच दरम्यान प्लेसमेंटसाठी निवड झाली होती. यात बीएनवाय मेलाॅन, टीसीएस, व्होडाफोन- आयडिया, अल्ट्राटेक सिमेंट, वालचंदनगर इंडस्ट्रीज, कल्याणी , भारत फोर्ज, भारत फोर्ज, एलएचपी (सोलापूर), टाटा भूषण, कायनेटिक इलेक्ट्रिक मोटार्स, गुबी कंस्ट्रक्शन, कोठारी ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड, यूएमसी टेक लॅब्स- कन्सल्टन्सी, हिरा ॲटोमोशन (पुणे), दिशा कन्सलटन्सी, प्रिसिजन कॅमशाॅप्ट (सोलापूर) अशा विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी निवड झाली होती.
आतापर्यंत विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्याची परंपरा सिंहगड सोलापूरने कायम ठेवली आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. आर. टी. व्यवहारे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.