School news | तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनात सिंहगड पब्लिक स्कूलचा तिसरा क्रमांक, 132 प्रयोग सादर

सोलापूर : निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत झालेल्या 52 व्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिंहगड पब्लिक स्कूल आणि ज्यूनियर काॅलेज यांनी यश मिळवले आहे. या स्पर्धेत प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत 132 प्रयोग सादर करण्यात आले.
9 आणि 10 डिसेंबर असे दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन केले होते. इयत्ता 6 वी ते 8 वी आणि इयत्ता 9 ते 12 अशा इयत्तेतील विद्यार्थी सहभागी झाली होती. अनेक शाळांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेस चांगला प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनात सिंहगड पब्लिक स्कूलच्या 9 वी कक्षातील विद्यार्थिनी सायरीस पठाण आणि तनिष्का कोकाटे यांनी ‘थ्रीडी इमेज ऑफ इन ऑबजेक्ट’ या विषयावर ‘होलोग्राम’ हा प्रोजेक्ट सादर केला. या प्रयोगास शाळेच्या शिक्षिका जुबेरिया शेख यांनी मार्गदर्शन केले. या प्रयोगाने तिसरा क्रमांक पटकावला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या यशस्वी खेळाडूचे सिंहगड स्कूलचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, शाळेच्या प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.