क्राईममहाराष्ट्र

Parbhani | परभणीतील हिंसाचार- 40 जणांना अटक, काय झालंय ?

 

परभणी : परभणी बंददरम्यान मोठी हिंसा झाली. याप्रकरणी घटनेसाठी जबाबदार असलेल्या 40 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, असे त्यांनी सांगितले.

आंबेडकरी अनुयायांकडून परभणी जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. बंद सुरु असताना या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान या ठिकाणी संविधानाची विटंबना एका माथेफिरूने केली होती.

हिंसक वळण लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच जमावाला शांत करण्यात पोलीसांना यश आले. जिल्हाधिकारी आणि आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये जिल्हाधिकारी दालनामध्ये बैठक झाली. यात संविधानाचे पुस्तक फाडणाऱ्या आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे आज परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला.

 

आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच जमावाला शांत करण्यात पोलीसांना यश आले. जिल्हाधिकारी आणि आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये जिल्हाधिकारी दालनामध्ये बैठक झाली. यात संविधानाचे पुस्तक फाडणाऱ्या आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे आज परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला.

 

परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची एका समाजकंटकाने विटंबना केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यात परभणी बंदची हाक देण्यात आली. तर दुसरीकडे परभणीच्या दिशेला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या जवळपास 15 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तसेच जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या 7 बसफेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

परभणी येथे एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना अतिशय संतापजनक, निषेधार्ह आहे. ह्या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. संविधानाला श्रेष्ठ मानणाऱ्या सर्वांनीच कायदा सुव्यवस्था पाळून आपले आंदोलन शांततेने करावे, असे आवाहन करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

 

परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या विरोधात आज आंबेडकरी अनुयायी यांनी काढलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणीत जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. यानंतर इथे जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले. इथे आज वाहने, घरं आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. तसेच परभणी जिल्ह्यात आज बंदची हाक पुकारण्यात आली. इथे पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानाचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. निषेध आंदोलनातुन त्या व्यक्त झाल्या आहेत आता आंबेडकरी जनतेने संयम बाळगून शांतता राखावी, असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button