आंतरमहाविद्यालयीन बाॅक्सिंग स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तिघांना रौप्य पदक

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात 22 नोव्हेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन बाॅक्सिंग स्पर्धा पार पडल्या. यात एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिघांनी रौप्य पदकावर मोहर उमटवली आहे.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील संघाने सहभाग घेतला होता. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्कृती केशेट्टीवार (75 किलो वजनी गटात), पंकज शिंदे (67/71 वजनी गट), पवन चव्हाण (48/51 वजनी गट) या तिघांनी रौप्य पदक पटकावले. याचा संस्था सहसचिव संजय नवले यांच्या हस्ते सत्कार केला.
या यशाबद्दल संस्था सचिव संजय नवले आणि प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी या संघाचे कौतुक करुन सन्मान केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. अभ्यासाबरोबर खेळालाही प्राधान्य द्या, पुढे याचा फायदा होणार असल्याचा सल्ला दिला. क्रीडा शिक्षक प्रशांत जाधव आणि क्रीडा समन्वयक डॉ. करीम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.