क्राईमसोलापूर

निवडणुकीचे वातावरण तापले, माकप उमेदवाराच्या घरावर दगडफेक

 

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक धामधुमीत सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार आणि शहर मध्यमधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या बापूजीनगर येथील घरावर काही तरूणांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

 

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केला आहे. यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी प्रचारासाठी घराबाहेर पडल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्या बापूजीनगर येथील घरावर दगडफेक केली. आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी ॲड. अनिल वासम यांना याबाबत माहिती कळवली. अनिल वासम यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या युवकांचा गोंधळ सुरू होता. वासम आणि अन्य काही जणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

आडम मास्तर हे सध्या महाविकास आघाडीतून बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप आडम मास्तरांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, दगडफेक करीत गोंधळ घालणारे कार्यकर्ते हे विरोधक असावेत. दारू पिऊन गोंधळ घालणे, विटांनी मारणे असे प्रकार सुरू होते. त्यांना रोखत असताना ॲड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

112 वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर का ? दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला. सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारा कळविण्यात आली. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरणावर नियंत्रण मिळवले.

 

त्यानंतर संबंधितावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले त्यावर जेष्ठ नेते मास्तर यांना ही बाब समजताच प्रचंड संतापले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button