एसपीएस लाॅयन्स सोलापूरने पटकाविला सिंहगड व्हॉलीबॉल चषक

सोलापूर : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा डाॅ. रचना नवले – अष्टेकर यांच्या संकल्पनेतून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कर्मचा-यांमध्ये फिटनेस आणि स्नेहभाव वाढावा या उद्देशाने या सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीगचे आयोजन केले जाते. सिंहगड इन्स्टिट्यूट च्या कर्मचा-यांसाठी आयोजित सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीगमध्ये व्हॉलीबॉल प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत एसपीएस लाॅयन्स सोलापूरने व्हॉलीबॉल चषक पटकावला आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सिंहगड संस्थेचे संस्थापक प्रा. एम. एन. नवले यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे मागील दोन वर्षांपासून आयोजन केले जात आहे. सिंहगड संस्थेच्या पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणच्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लाॅन टेनिस, अथिलॅटिक, स्विमिंग, स्नूकर अशा दहा क्रीडा प्रकाराचा समावेश होता. या स्पर्धा 21 ते 30 डिसेंबर या कालावधीत पुण्यात पार पडल्या. यंदाच्या वर्षी पुरुष गटासह महिलेचा संघ तयार करुन क्रिडा प्रकारात महिलांचाही सहभाग वाढवण्यात आला. सदर स्पर्धेत महिला व पुरुष असे एकूण दोन हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमुळे कर्मचा-यात उत्साह दिसून येत होता.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्था सचिव डाॅ. सुनंदा नवले, उपाध्यक्षा डाॅ. रचना नवले – अष्टेकर यांच्या हस्ते पार पडले. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीत आपल्या कर्मचा-यांची तब्येत तंदुरुस्त राहावे, कर्मचा-यातील क्रीडा – गुणांना वाव मिळावा. त्यांचे माईंड फ्रेश व्हावा या हेतूने उपाध्यक्ष डाॅ. रचना नवले – अष्टेकर यांच्या संकल्पनेतून या सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीगचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. बक्षीस वितरण समारंभ 30 डिसेंबर रोजी वडगाव बु. या शैक्षणिक संकुलात दिमाखात पार पडला.
● सिंहगड सोलापूर लायन्सचे यश
एसपीएस लाॅयन्स सोलापूर संघात सोलापूर, व कमलापूर येथील कर्मचाऱ्याचा समावेश होता. यात व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, क्रिकेट मध्ये क्वार्टर फायनल पर्यंत यश मिळवून सेमी फायनलपर्यंत धडक मारली. पण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सलग दुस-यांदा प्रविण शिंदे यांनी यश मिळविले. शंभर मीटर धावण्यात प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक ) प्रियांका बिराजदार (सिंहगड पब्लिक स्कूल, सोलापूर) आणि रिले प्रकारात (सांघिक) रौप्य पदक महेश देडे, माऊली सुर्यवंशी, विकास झोळ, श्रीकांत म्हेत्रे, बापू म्हेत्रे यांनी पटकावला.
यशस्वी कर्मचा-यांचे सोलापूर कॅम्पस चे डायरेक्टर संजय नवले, सोलापूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, कमलापूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या चैताली मराठे, सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे, डॉ. रवींद्र व्यवहारे यांनी अभिनंदन करुन पारितोषिक विजेत्यांचा सत्कार केला.