दक्षिण सोलापूर मतदार संघात आता बदल घडवा – संतोष पवार

सोलापूर – दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांवर बोट ठेवत या मतदारसंघात आता बदल घडवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेवू पवार यांनी केले.
मंद्रूप येथे आयोजित कॉर्नर सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतोष पवार यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील प्रलंबित समस्यांवर थेट आक्रमण केले आणि जनतेला बदलाची हाक दिली.
आजवर तालुक्यातील जनतेला विकासाच्या नावाखाली फसविणाऱ्या धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांवर कडाडून टीका करताना तालुक्यातील सिंचनाच्या रखडलेल्या प्रकल्पांपासून बेरोजगारीच्या समस्येपर्यंत, तसेच एमआयडीसी च्या उभारणीतील अपयश आणि जाती-धर्माच्या आधारावर खेळले जाणारे राजकारण यांवर त्यांनी परखड भाष्य केले. आम्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. आजवर जनतेला दिलेली खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वेळी परिवर्तन हवे आहे,” असे पवार यांनी ठामपणे सांगितले.